AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10वी पास उमेदवारांसाठी लवकरच पदभरती होणार!
नोकरीन्यूज १८ लोकमत
10वी पास उमेदवारांसाठी लवकरच पदभरती होणार!
➡️महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सोलापूर इथे १०वी पास उमेदवारांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १० ऑक्टोबर २०२१ असणार आहे. या पदांसाठी भरती अप्रेन्टिस (इलेक्ट्रिकल) Apprentice (Electrical) - एकूण जागा ६३ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अप्रेन्टिस (इलेक्ट्रिकल) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि त्यांनतर ITI पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा ➡️या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. हे कागदपत्रं आवश्यक 1)पासपोर्ट साईझ फोटो 2)ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म 3)शाळा सोडल्याचा दाखला 4)ITI प्रमाणपत्र 5)मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक. 6) आधार कार्ड, पासबुक आवश्यक. काही महत्त्वाच्या सूचना ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती आणि तपशील भरणं आवश्यक आहे. उमेदवारांची निवड दहावी आणि ITI च्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज - १० ऑक्टोबर २०२१ या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apprenticeshipindia.org/ या लिंकवर क्लिक करा 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
7
इतर लेख