AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँकमध्ये नोकरीची मोठी संधी!
नोकरीन्यूज १८ लोकमत
10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँकमध्ये नोकरीची मोठी संधी!
➡️ बँक ऑफ इंडिया कोल्हापूर आणि सांगली इथे लवकरच दहावी उत्तीर्ण उमेदवरांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यालयीन सहाय्यक, परिचर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२१ असणार आहे. या पदांसाठी भरती 1)कार्यालयीन सहाय्यक- एकूण जागा 03 2) परिचर - एकूण जागा 01 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 1) कार्यालयीन सहाय्यक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांनी पदवीपर्यँतनशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 2) परिचर- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार कार्यालयीन सहाय्यक- या पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना १५,००० रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार आहे. परिचर - या पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना ८,००० रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार आहे. अशी होणार निवड पात्र असणाऱ्या आणि अर्ज पाठवण्यात आलेल्या उमेदवारांची सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेतून निवडण्यातनं आलेल्या निवडक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक 1)Resume (बायोडेटा) 2)दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं 3)शाळा सोडल्याचा दाखला 4)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) 5)ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) 6)पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, १५१९ सी, जयधवल, बिल्डींग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
8