AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10वी उत्तीर्णांनो, 'या' जिल्ह्यासाठी मोठी पदभरती!
नोकरीन्यूज १८ लोकमत
10वी उत्तीर्णांनो, 'या' जिल्ह्यासाठी मोठी पदभरती!
➡️महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अमरावती इथे लवकरच काही पदांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार वीजतंत्री - एकूण जागा 35 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ➡️या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत पूर्णवेळ शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा ➡️या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 वर्ष ते 38 वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता कार्यकारी अभियंता, अउदा संवसु, प्रशासकिय इमारत, बी विंग, तळमजला, वेलकम पॉइंट जवळ, मोरशी, रोड, अमरावती – ४४४६०१. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 असणार आहे या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा संदर्भ:-न्यूज १८ लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
11
इतर लेख