AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10वा हप्ता मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर!
कृषी वार्तान्यूज १८ लोकमत
10वा हप्ता मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर!
पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे त्याची बेनिफिशियरी लिस्ट मोदी सरकारने जारी केली आहे. यावेळचा हप्ता १५ ते २५ डिसेंबरदरम्यान केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. सरकारने याकरता योजनाही आखली आहे. तुम्ही देखील या लिस्टमध्ये तुमचं नाव तपासू शकता. आतापर्यंत, सरकारने देशातील 11.37 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली आहे. आता दहाव्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची यादीही प्रसिद्ध झाली आहे. अशाप्रकारे तपासा यादीमध्ये तुमचं नाव -याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. -त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी देखील करू शकता. -याठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी या वेबसाइटवर अपलोड केली आहे. याठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील समजेल. यासंदर्भातील माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरच्या माध्यमातून देखील मिळवू शकता. -'फार्मर कॉर्नर'वर जाऊन बेनिफिशियरी स्टेट्स (Beneficiary Status) च्या लिंकवर क्लिक करा. -याठिकाणी तुम्हाला आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल. -याठिकाणी सरकार लाभार्थ्यांची पूर्ण यादी देखील अपलोड करते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे आधार, बँक डिटेल्स आणि मोबाइल नंबरच्या साहाय्याने माहित करुन घेऊ शकता. तुम्ही मिळणाऱ्या हप्त्याचं स्टेटस देखील अशाप्रकारे जाणून घेऊ शकता. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
50
10
इतर लेख