AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 1 दिवसांत 30 एकराची फवारणी शक्य
योजना व अनुदानAgrostar
1 दिवसांत 30 एकराची फवारणी शक्य
➡️आजच्या आधुनिक युगात, तंत्र आणि यंत्रांनी शेती करणे अनेक पटींनी सोयीचे झाले आहे. पूर्वी शेतावर निगराणी आणि फवारणी करण्यात खूप अडचण येत असे, परंतु आता कृषी ड्रोनच्या मदतीने हे कामही काही मिनिटांत करता येते. अनेक योजनांद्वारे केंद्र सरकार हे कृषी ड्रोन 40 ते 100% अनुदानावर उपलब्ध करून देत आहे. ➡️गेल्या काही दिवसांपूर्वी शेतीमध्ये औषध फवारणीसाठी ड्रोन नावाची संकल्पना पुढे आली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता त्याचा शेतीत मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, याचा अंदाज लावता येतो की एखाद्या व्यक्तीला पिकावर फवारणी करायला बरेच दिवस लागायचे, तर ड्रोनने तेच काम काही तासांत किंवा दिवसभरात करायचे असते. ड्रोनने शेतीत काय बदल केले आहेत, सरकारचे काय नियोजन आहे, यावर बोलूया. ➡️ड्रोनची किंमत 6 ते 8 लाखांपर्यंत असते. यासाठी कंपनी हमीही देते. काही तांत्रिक बिघाड झाल्यास, कंपनी ते दुरुस्त देखील करते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ड्रोनने 30 एकर पिकावर 1 दिवसात औषध फवारणी केली जाऊ शकते, फीबद्दल बोलायचे झाले तर एका दिवसाची फी 500 ते 900 रुपये आहे. ➡️ड्रोन खरेदीसाठी अटी आणि पात्रता: * शेतकऱ्यांना सरकारने ठरवून दिलेल्या कंपनीचाच ड्रोन खरेदी करावा लागणार आहे. नागरी हवाई उड्डाण विभागाच्या माध्यमातून मान्यता दिलेल्या ड्रोनलाच अनुदान दिले जाणार आहे. * शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी ‘डिजिटल स्काय पोर्टल’ या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. ड्रोनमध्ये अपघात नियंत्रक, चढ-उतार क्षमता, जेथून उडविले तेथेच परत येण्याची यंत्रणा आणि त्यामध्ये छायाचित्रही काढता येणे गरजेचे आहे. * ड्रोनची कंपनी ही भारतामधलीच असून त्यामध्ये सोई-सुविधा असणे गरजेचे आहे. शिवाय भारतीय गुणवत्ता प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. * ज्या राज्यातील शेतकऱ्याने ड्रोन खरेदी केले आहे तिथेच त्याला प्रशिक्षण आणि देखभाल दुरुस्तीचे काम करता येणे गरजेचे आहे. ➡️कोणाला मिळणार किती अनुदान? * ड्रोन खरेदी करुन त्याचा शेतीव्यवसायात वापर करणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे अनुदानावर उपलब्ध करुन दिले जात आहे. यामध्ये अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमाती यांना 5 लाखापर्यंतचे अनुदान असणार आहे. * शेतकरी उत्पादक कंपनी तसेच इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 4 लाखापर्यंतचे अनुदान. तर केव्हीके, कृषी विद्यापीठे, कृषी यंत्रे व अवजारे तपासणी यासारख्या संस्थांना 10 लाखापर्यंतचे अनुदान असणार आहे. ➡️संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
8
इतर लेख