AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
1 जुलैपासून ‘या’ कंपनीच्या दुचाकींची किंमत वाढणार!
सल्लागार लेखTV9 Marathi
1 जुलैपासून ‘या’ कंपनीच्या दुचाकींची किंमत वाढणार!
➡️ देशातील आघाडी वाहननिर्माती कंपनी असणाऱ्या हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकींची किंमत 1 जुलैपासून वाढणार आहे. कंपनीच्या सर्वच दुचाकींच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच हिरो मोटोकॉर्पकडून करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारपासून नवे दर लागू होतील. ➡️ कंपनीच्या या निर्णयामुळे हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकींच्या सर्वच मॉडेल्सची किंमत साधारण 3000 रुपयांनी वाढेल. यापूर्वी मार्च महिन्यात हिरोच्या दुचाकींची किंमत 2500 रुपयांनी वाढवण्यात आली होती. गेल्या काही काळात उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दुचाकींच्या किंमतीत वाढ केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. 28000 रुपयांच्या बंपर डिस्काउंटसह Hero इलेक्ट्रिक स्कूटर्स खरेदी करा ➡️ इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करत आहेत. इलेक्ट्रिक दुचाकींच्या खरेदीला चालना देण्यासाठी सरकारने फेम II च्या अनुदानामध्येही बदल केला आहे, त्यानंतर या वाहनांची किंमत आणखी कमी झाली आहे. या वाहनांच्या किंमती हजारो रुपयांनी कमी झाल्या आहेत. ➡️ FAME II अनुदानाच्या दुरुस्तीनंतर, सर्व इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी त्यांच्या दुचाकी आणि स्कूटरची किंमत कमी केली आहे. हिरो इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरच्या किंमतीतही 12 ते 33 टक्क्यांनी कपात केली असून यामध्ये सर्वाधिक फायदा ट्रिपल बॅटरीसह येणाऱ्या Nyx HX स्कूटरमध्ये दिला जात आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.➡️ ➡️ ➡️
10
3