AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
1 जून पासून बदलणार 5 महत्त्वाचे नियम!
कृषी वार्तालोकमत न्युज १८
1 जून पासून बदलणार 5 महत्त्वाचे नियम!
➡️ 1 जूनपासून तुमच्याशी थेट निगडीत असणाऱ्या काही नियमांत बदल होणार आहे. यापैकी हे पाच नियम अत्यंत महत्वाचे आहेत, त्याचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो. यामध्ये बँकिंग संबंधित, आयटीआर संबंधित आणि एलपीजी गॅस संबंधित काही नियमात बदल होणार आहे. 1 जूनपासून बँक ऑफ बडोदामध्ये चेक पेमेंट करण्याची पद्धती बदलणार आहे. शिवाय 1 जूनपासून एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होईल, तुम्ही जर घरगुती एलपीजी गॅस घेत असाल तर तुम्हाला या नवीन किंमतीनुसार खरेदी करावी लागेल. 1. स्मॉल सेव्हिंग स्कीम्सच्या व्याजदरात बदल ➡️ PPF, NSC, KVP आणि सुकन्या समृद्धी सारख्या स्मॉल सेविंग स्कीम्स या योजनांच्या व्याजदरात याच महिन्यात बदल होईल. सरकार दर तीन महिन्यांनी या योजनांसाठी नवे व्याजदर लागू केले जातात. अनेकदा जुने व्याजदर रिव्हाइज केले जातात. याआधी 31 मार्च 2021 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीअंती नवीन व्याजदर लागू करण्यात आले होते. पण ते 24 तासांच्या आतमध्ये मागे घेऊन जुनेच दर लागू करण्यात आले होते. आता 30 जूनला नवीन दर लागू होण्याची शक्यता आहे. 2. बँक ऑफ बडोदामध्ये पॉझिटिव्ह पे सिस्टिम ➡️ बँक ऑफ बडोदाने ग्राहकांसाठी 1 जून 2021 पासून पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन अनिवार्य केले आहे. ग्राहक फसवणुकीची शिकार होऊ नयेत हा यामागचा मानस आहे. पॉझिटिव्ह पे प्रणाली एक प्रकारे फ्रॉड शोधणारं टूल आहे. या सिस्टिम अंतर्गत ग्राहकांने चेक जारी केल्यानंतर बँकेला संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. चेक पेमेंट करण्याआधी बँक ही माहिती क्रॉस चेक करेल. जर यामध्ये कोणताही गोंधळ आढळून आल्यास बँक तो चेक रिजेक्ट करेल. 3. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती बदलणार ➡️ एक जूनपासून एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये देखील बदल होऊ शकतो, काही वेळा या किंमती देखील स्थिर राहतात. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या नव्या किंमती जारी केल्या जातात. सध्या देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 809 रुपये आहे, तर 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमती देखील बदलू शकतात. 4. जास्त गुगल स्टोरेजसाठी द्यावे लागणार वेगळे पैसे ➡️ गुगल आता या आपल्या अ‍ॅप्लिकेशनसाठी फ्री स्टोरेज सुविधा बंद करणार आहे. जगभरातले कोट्यवधी युजर्स गूगल फोटोज हे अ‍ॅप्लिकेशन वापरतात. 1 जूनपासून गुगल प्रत्येक अकाउंटला एकूण 15 जीबी क्लाउड स्टोरेज देणार असून, त्यात गुगलच्या सगळ्या प्रॉडक्ट्समधल्या डेटाचा समावेश आहे. म्हणजेच एका अकाउंटचं Gmail, Google Docs, Sheets, Drives आणि गुगलच्या अन्य सेवांमध्ये मिळून एकूण 15 जीबी डेटा मोफत साठवता येऊ शकतो. 15 जीबीपेक्षा जास्त स्टोरेजसाठी आता Google One चं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. त्यात 100 जीबीच्या स्टोरेजसाठी 19.99 डॉलर्स अर्थात भारतीय चलनात सुमारे 1460 रुपये भरावे लागतील. 5. 1 जूनपासून काही दिवस बंद राहणार इन्कम टॅक्स ई-फायलिंगची साइट ➡️ 1 जून ते 6 जून इन्कम टॅक्स विभागाचे ई-फायलिंग पोर्टल बंद राहणार आहे. तर 7 जून रोजी इन्कम टॅक्स विभाग करदात्यांसाठी इन्कम टॅक्स ई-फायलिंगसाठी नवीन पोर्टल लाँच करेल. अर्थात आयटीआर भरण्याची अधिकृत साइट आता 7 जूनपासून बदलणार आहे. 7 जूनपासून ही साइट http://INCOMETAX.GOV.IN असेल. सध्या तुम्ही http://incometaxindiaefiling.gov.in या साइटचा वापर करत आहात. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत न्युज१८ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
4
इतर लेख