कृषि वार्ताAgrostar
ई-पीक नोंदणी शेवटची तारीख जाहीर!
➡️पावसाने दिलेला खंड आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे पीक विम्याला राज्यात महत्त्व आलेले दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात मोठा पावसाचा खंड पडला. या पावसाच्या खंडामुळे पिके हातची जाण्याची वेळ आलेली आहे . 50 टक्क्यांपेक्षाही कमी कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे उत्पादन येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना पीकविम्याचा मोठा आधार मिळेल.
➡️परंतु ही मदत पीक विमा ई-पीक पाहणीवर अवलंबून आहे.ज्या पिकाची नोंद ई-पीक पाहणीत असेल तेच पीक ग्राह्य धरण्यात येणार आहे सध्या ई-पीक पाहणीची प्रक्रिया राज्यात सुरु झालेली आहे.
➡️ई-पीक पाहणी नोंद करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करून अँप डाउनलोड करा :https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
➡️राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून शेतातील विविध पिकांची आपल्या ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत होती.परंतु आता खरीप हंगाम 2023 ची ई-पीक पाहणी नोंदणी 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत करा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
➡️संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.