AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 इ-बाइक फक्त 999 रूपयांत करा बुक!
ऑटोमोबाईलAgrostar
इ-बाइक फक्त 999 रूपयांत करा बुक!
🏍️आकर्षक लूक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकने सुशोभित केलेली ओडिसी वडेर ही देशातील पहिली बाईक आहे ज्यामध्ये 7-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, ज्याचा वापर अँड्रॉइड डिस्प्ले आणि गूगल मॅप नेव्हिगेशनसाठी केला जाईल. कंपनीने ही बाईक 1,09,999 रुपये च्या किमतीत लॉन्च केली आहे. 🏍️ओडिसी वडेर हि बाईक अनेक प्रकारे खास आहे. ही इलेक्ट्रिक बाइक दैनंदिन वापरासाठी अतिशय योग्य मानली जाते, कंपनीने यामध्ये 18 लिटर क्षमतेची स्टोरेज स्पेस दिली आहे. याशिवाय, ही बाईक अनेक वेगवेगळ्या रंगांमध्ये देखील उपलब्ध आहे, ज्यात मिडनाईट ब्लू, फेयरी रेड, ग्लॉसी ब्लॅक, व्हेनम ग्रीन आणि मिस्टी ग्रे यांचा समावेश आहे. 🏍️बॅटरी पॅक आणि परफोर्मन्स: कंपनीने या बाईकमध्ये 3.7 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी 3 kW क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरला जोडलेली आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 6 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही बाईक एका चार्जमध्ये 125 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते आणि तिची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 4 तास लागतात. त्याचा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास आहे. 🏍️फक्त 999 रुपयात बुक करता येणार : नवीन ओडिसी वडेर लाँच करण्यासोबतच कंपनीने अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. इच्छुक ग्राहक ही बाईक कंपनीच्या अधिकृत डीलरशिपद्वारे फक्त रु.999 मध्ये बुक करू शकतात. येत्या जुलै महिन्यापासून या बाईकची डिलिव्हरी सुरू होणार असून, या बाईकचे खरेदीदार फेम-2 सबसिडीचा लाभ घेऊ शकतात. 🏍️वडेरचे कर्ब वजन 128 किलो आहे, त्याला कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम (CBS) आणि समोर (240mm) आणि मागील (220mm) डिस्क ब्रेक मिळतात. मोटरसायकलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमसह 7-इंचाचे इन्स्ट्रुमेंट पॅनेल आहे आणि ते अॅप आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. यात एलईडी लाइटिंग आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग देखील मिळते. 🏍️संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
92
20