पी एम किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता या दिवशी जमा होणार.
कृषि वार्ताकृषी जागरण
पी एम किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता या दिवशी जमा होणार.
➡️पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात २५ डिसेंबर रोजी आणखी एक हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील रायसेन च्या संमेलनात दिली. ➡️पंतप्रधान किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजारांची आर्थिक मदत वर्षातून तीन वेळा असे दोन दोन हजार रुपयांच्या हप्ते शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जातात. ➡️पी एम किसान सन्मान योजनेत सरकारी पैसे तीन टप्प्यात हस्तांतरित करते. यातील पहिला टप्पा हा एक डिसेंबर ते ३१ मार्च दुसरा एक एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान आणि तिसरा एक ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. ➡️पतप्रधान किसान योजना अंतर्गत सातव्या हप्त्यात सरकार अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा आत्ता हस्तांतरित करणार आहे. ➡️मागील काही दिवसांमध्ये लक्षात आले की काही शेतकऱ्यांनी फसवणूक करून या योजनेचा लाभ घेतला. अशा शेतकऱ्यांना आता सरकार कडक कारवाई करणार आहे. ➡️जर कागदपत्र बरोबर असतील तर सर्व ११ कोटी पेक्षा जास्त नोंदणी करून शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ होईल. त्यामुळे तुमची नोंद तपासून घेणे गरजेचे आहे. ➡️जेणेकरून पैसे मिळण्यास कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही. जर तुमचा रेकॉर्डमध्ये काही गडबड असेल तर तुम्हाला नवीन योजनेचा लाभ मिळणार नाही. ➡️कृषी मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार १.३ कोटी शेतकऱ्यांना कर्ज करून पैसे मिळालेले नाहीत. याचे प्रमुख कारण त्यांची नोंद चुकीची आहे किंवा आधार कार्डची माहिती उपलब्ध नाही. तर काहींच्या नावांमध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याने पैसे देखील थांबविण्यात आले आहेत. ➡️त्यामुळे आपल्या रेकॉर्ड बरोबर आहे की नाही हे तपासून घ्यावे. त्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट pmkisaan.gov.in ह्यावर लॉगिन करून तुमची माहिती तपासून घ्यावी. कोणतीही चुकीची माहिती भरली गेली असेल अपलोड झाली असेल तर ती दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून आपला हप्ता थांबणार नाही. संदर्भ - कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
123
23
इतर लेख