पी एम शेतकरी सन्मान योजनेने रचला रेकॉर्ड, या तारखेला १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये!
कृषी वार्तान्यूज18
पी एम शेतकरी सन्मान योजनेने रचला रेकॉर्ड, या तारखेला १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये!
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने मंगळवारी मोठा रेकॉर्ड रचला आहे. या योजनेचे आता १० कोटींपेक्षा जास्त लाभार्थी झाले आहेत. सरकारला आता आणखी ४.५ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा पोहचवायचा आहे. या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील सर्वात अधिक २ कोटी ३० लाख शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत. या योजनेमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी वार्षिक ६००० रुपये मिळतात. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या मते ही योजना शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यास अत्यंत महत्त्वाची आहे. कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना १ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे. जर तुम्ही उर्वरित ४.५ कोटी शेतकऱ्यांपैकी असल्यास, तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. जर अर्ज तुम्ही केला असल्यास त्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी पी एम-किसान चा हेल्पलाइन नंबर ०११-२४३००६०६ वर संपर्क करू शकता. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे का हे तुम्हाला तपासायचे आहे, तर आता हे काम देखील ऑनलाइन शक्य आहे pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासू शकता. याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची स्थिती देखील तपासून पाहू शकता. 'फार्मर कॉर्नर'वर जाऊन 'लाभार्थी सूची' (लाभार्थी यादी) च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही 'अहवाल मिळवा' वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल. या शेतकऱ्यांना नाही मिळणार योजनेचा लाभ असे शेतकरी जे माजी किंवा सध्या संविधानीक पदावर आहेत, माजी किंवा सध्या मंत्री, महापौर, जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा किंवा राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा समावेश ते शेती करत असले तरी या योजनेत केला जात नाही. केंद्रात किंवा राज्य सरकारमध्ये अधिकारी त्याचप्रमाणे १० हजारांहून अधिक पेन्शन घेणारे कर्मचारी डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वकील, आर्किटेक्ट यापैकी कुणी शेती करत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. संदर्भ - न्युज १८ ९ जुलै २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
259
16
इतर लेख