AgroStar
२० लाख टन साखर निर्यातीचे करार पूर्ण
कृषि वार्तापुढारी
२० लाख टन साखर निर्यातीचे करार पूर्ण
पुणे – केंद्रशासनाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशातून ६० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यापैकी सदय:स्थितीत २० लाख टन इतक्या साखर निर्यातीचे करार पूर्ण झाले असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.
देशातील शिलकी साठयामुळे साखरेचे भाव स्थिरावतील, असा अंदाजही त्यांनी वर्तविला. देशातील साखरेचा अतिरिक्त कमी करण्यासाठी साखर निर्यात हा एकमेव पर्याय आहे. साखर उदयोगाच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने २०१८-१९ मध्ये सुमारे ५० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. त्यामध्ये देशातील कारखान्यांकडून ३७ लाख टन इतक्या साखरेची निर्यात पूर्ण झाली. चालूवर्षी साखर निर्यातीचा कोटा ६० लाख टन इतका निर्धारित करण्यात आलेला आहे. त्यापैकी सध्या २० लाख टन साखर निर्यातीचे करार पूर्ण करण्यात कारखान्यांना यश मिळाले आहे. भारतीय साखरेस प्रामुख्याने इराण, इंडोनेशिया, बांगलादेशमधून चांगली मागणी आहे. देशातील कारखान्यांना साखर निर्यातीची चांगली संधी उपलब्ध असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. संदर्भ – पुढारी, २५ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
82
0
इतर लेख