नई खेती नया किसानMarathi abplive
अरे वा! साताऱ्याच्या दोन प्रयोगशील शेतकऱ्यांनी साधली किमया!
➡️सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुका म्हणजे कायमच दुष्काळाने ग्रासलेला. कारण शेतकऱ्यांच्या पिकांवर निसर्ग अक्षरशः पाणीच फेरतो. एकतर पाऊस अनपेक्षित असतो किंवा अवकृपा दाखवतो. अशा अनेक समस्या झेलताना पदरी मात्र निराशाच येते. पिकासाठी खर्ची घातलेला पैसा हाती येण्याची ही शाश्वती नसते.
➡️मग अशा दुष्काळात स्ट्रॉबेरी बहरली, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? पण हे खरं आहे. साताऱ्याच्या दुष्काळी खटाव तालुक्यातील 'त्या' शेताच्या बांधावर साक्षात या दुष्काळी जमिनीवर स्ट्रॉबेरी पिकलेली आहे. साताऱ्याच्या खटाव मधील सचिन कोचरेकर आणि प्रशांत भोसले या प्रयोगशील शेतकऱ्यांनी ही किमया साधलीये.
➡️स्ट्रॉबेरीची शेती म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं ते थंड हवेचं ठिकाण. पण आता हीच स्ट्रॉबेरी चक्क दुष्काळात बहरलेली आहे. साताऱ्याच्या दुष्काळी खटाव तालुक्यातील हे चित्र सुखद धक्का देणारं आहे. सचिन कोचरेकर आणि प्रशांत भोसले या दोन प्रयोगशील शेतकऱ्यांनी ही किमया साधली.
➡️सचिन कोचरेकर म्हणतात, थंड हवेत पिकणारी स्ट्रॉबेरी उष्ण हवामानात कशी पिकवायची? हे आमच्यासमोर आव्हान होतं. यासाठी महाबळेश्वर मधील तज्ञ शेतकऱ्यांना आम्ही या ओसाड जमिनीवर आणलं. या उष्ण तापमानात स्ट्रॉबेरीची शेती करायची असल्याचं त्यांना सांगितलं. मग त्यांनी आम्हाला त्याबाबत मार्गदर्शन केलं.
➡️गेली तीन वर्षे आम्ही यावर अभ्यास केला, मग गेल्या ऑगस्टमध्ये तीस गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे पीक घेतले. ऑक्टोबर मध्ये ही स्ट्रॉबेरी बहरली. आता रोज १५ हजारांप्रमाणे महिन्याकाठी ५ लाखांची उलाढाल सुरू झाली. पण प्रयोग इथंच थांबला नाही, तर प्रशांत भोसले सांगतात की याच स्ट्रॉबेरी मध्ये आंतरपीक घ्यायला सुरुवात केली. सध्या स्ट्रॉबेरी शेतीच्या काही क्षेत्रात लसणाची लागवड करण्यात आलीये. उर्वरित क्षेत्रात दुसरं आंतरपीक घेणार आहेत.
➡️ आणि गोव्याच्या बाजारात या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे. त्यामुळेच रोज स्ट्रॉबेरीची तोड करावी लागते. पॅकिंग ही आलंच. यासाठी किमान दहा बेरोजगारांना रोजगार मिळालाय. आधीच दुष्काळ आणि त्यात कोरोना यामुळं कुटुंबावर संकट ओढवलं होतं. पण सचिन आणि प्रशांत यांनी स्ट्रॉबेरी पिकविल्याने त्यांच्या हाताला रोज काम आहे.
➡️थंड हवेत पिकणारी स्ट्रॉबेरी उष्ण तापमानात येत असेल तर तापमानावर मात करत शेतीचे प्रयोग करता येतील.याची खात्री पटलीअसेल सर्वांना.
संदर्भ:-Marathi abplive,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.