तीन कृषी कायदे मागे घेणार – पंतप्रधानांची घोषणा
कृषी वार्तालोकमत
तीन कृषी कायदे मागे घेणार – पंतप्रधानांची घोषणा
गेल्या वर्षभरापासून चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. अखेर पंतप्रधान मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे. देशवासियांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक व शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावे, शेतीमध्ये जाऊन कामे करावी, एक नवीन सुरूवात करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आम्ही प्रयत्न करून ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकऱ्यांचा वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजविण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमातून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही, असेदेखील पंतप्रधान म्हणाले. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
2
इतर लेख