AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा कोणती बाईक मायलेजमध्ये कोण वरचढ?
ऑटोमोबाईललोकसत्ता
पहा कोणती बाईक मायलेजमध्ये कोण वरचढ?
➡️बाइक सेगमेंटमध्ये, मायलेज असलेल्या १०० सीसी बाइक्सनंतर १२५ सीसी बाइक्सना सर्वाधिक मागणी आहे. १२५ सीसीच्या अनेक कंपन्यांच्या बाइक्स बाजारात उपलब्ध आहे. हिरो ग्लॅमर आणि होंडा शाइन बाइक्स या दोन्ही बाईकच्या किमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती सांगणार आहोत. हिरो ग्लॅमर: हिरो ग्लॅमर ही कंपनीची १२५ सीसी सेगमेंटची एक स्टायलिश बाइक आहे. कंपनीने Xtec अवतारमध्ये नुकतीच सादर केली आहे. बाइकमध्ये सिंगल-सिलेंडर १२४.७ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे १०.७ पीएस पॉवर आणि १०.६ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ➡️बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये पुढच्या चाकासाठी डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे संयोजन दिले आहे. अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर आहे. ही नवीन हीरो ग्लॅमर बाईक ८० किमीचा मायलेज देते आणि मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. हिरो ग्लॅमरच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने ७५,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच केली आहे. होंडा शाइन: होंडा शाइन कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्सपैकी एक आहे. कंपनीने दोन व्हेरियंटसह बाजारात आणली आहे. बाइकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे एअर-कूल्ड फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १०.७४ ची कमाल पॉवर आणि ११ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते, ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ➡️ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. तसेच अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. मायलेजबद्दल, होंडाचा दावा आहे की ही बाइक ६५ किमीचा मायलेज देते आणि मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. होंडा शाइन कंपनीने ७४,४४२ रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केली आहे. संदर्भ:- लोकसत्ता, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
29
5