AgroStar
पती-पत्नी दोघेही  मिळवा दरवर्षी 72 हजार रुपये पेन्शन !
समाचारAgrostar
पती-पत्नी दोघेही मिळवा दरवर्षी 72 हजार रुपये पेन्शन !
👉🏻प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : या सरकारी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वार्षिक 36 हजार रुपयांची पेन्शन मिळणे शक्य आहे. यासाठी तुम्हाला प्रतिमहिना 55 रुपये गुंतवणुकीवर दरमहा तीन हजार रुपयाची पेन्शन सुरू होते. ज्या व्यक्ती या योजनेचे सदस्य असतील त्यांना त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह तीन हजार रुपये पेन्शन मिळण्याचा हक्क आहे. या हिशोबाने एखाद्या व्यक्तीला दरवर्षी छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळू शकते. 👉🏻जर पती पत्नी मिळून दोघांनी या योजनेत पात्र असाल व सहभाग नोंदवला असेल तर त्यांना दरवर्षी 72 हजार रुपये पेन्शन मिळते. समजा याच्या मध्ये जर एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाला व त्याच्या लाभार्थी पैकी जोडीदाराला कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून निम्मी पेन्शन मिळते. 👉🏻कुणाला घेता येतो या योजनेचा लाभ : १.जे भारतीय नागरिक असंघटित क्षेत्रात काम करतात अशा कोणत्याही नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येतो. २.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून त्याचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असावे. परंतु जे लाभार्थी आयकर, एपीएफओ, एनपीएस आणि ईएसआयसीचे सदस्य आहेत, अशांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. 👉🏻यामध्ये पैसे जमा करण्याचे स्वरूप : १. ज्यांचे वय 18 वर्षे आहे अशा व्यक्तींना अर्ज करायचा असेल तर वयाच्या साठ वर्षापर्यंत पंचावन्न रुपये दरमहा जमा करावे लागतील.समजा एखाद्याचे वय 29 वर्षे असेल तर अशा व्यक्तीला या योजनेत पेन्शनचा लाभ घेण्यासाठी वयाच्या साठ वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला शंभर रुपये जमा करावे लागतील आणि २. ज्या व्यक्तीचे वय 40 वर्षे असेल व अशा व्यक्तीला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर त्यांना प्रति महिन्याला 200 रुपये जमा करावे लागतील. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत तुम्ही जितके पैसे जमा कराल तितकेच सरकारद्वारे जमा केले जातात. 👉🏻योजनेच्या नोंदणीसाठी : जर तुम्हाला या योजनेत नाव नोंदणी करायचे असेल तर तुमच्याकडे आधार क्रमांक, मोबाईल फोन आणि एक बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी अर्थात कॉमन सर्विस सेंटरमध्ये अर्ज करू शकता. 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
13
इतर लेख