AgroStar
भाग-१) मधमाशी पालन करून वाढवा उत्पादन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाग-१) मधमाशी पालन करून वाढवा उत्पादन
मधमाशी पालन हा शेतीशी संबंधित एक लहान व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून मध व मेणाची विक्री करता येते. हा व्यवसाय कमी खर्च व अधिक उत्पादन देणारा आहे तसेच मधमाशांच्या परागणानंतर राहिलेल्या धान्याचे वजन आणि पोषण चांगले राहिल्यामुळे शेती आणि बागायती उत्पादनदेखील वाढवू शकते. मधमाशी पालनचे महत्व – • मधमाश्या उत्कृष्ट परागकण गोळा करतात. जे एका वेळी १०० फुलांचे परागकण व मध गोळा करू शकतात. • मधमाशी सामान्य कीट मानली जाते. मधमाशीच्या पोळात २० ते ८०,००० मधमाशी एकत्र राहतात. • मधमाश्या फुलांच्या रोपामध्ये १६% परागिकरण वाढवू शकतात. आवश्यक साहित्य- लाकडी पेटी, मधमाश्यापासून संरक्षण करणारी जाळी, मध काढण्यासाठी चाकू, मध गोळा करण्यासाठी ड्रम
मधमाशीचा प्रकार- ऍपिस मेलीफेरा, एपिस इंडिका, एपिस डोरसाटा, एपिस फ्लोरिया आणि मेलिपोना इरिडिपेनिस या पाच प्रकारच्या मधमाश्या आहेत. ऍप्स मेलीफेरा मधमाश्या या व्यवसायासाठी मधुर उत्पादक आणि शांत स्वभाव आहेत. कोचमध्ये हे सहजपणे वाढवता येते. या प्रजातीच्या राणीची अंडी घालण्याची क्षमता अधिक असते. संदर्भ- श्री. एस. के. त्यागी जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
557
2
इतर लेख