अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
तीळ पिकाची पेरणी विषयक माहिती!
तीळ पीक वाढीसाठी 25 ते 27 अंश सेल्सिअस तापमान पोषक असते. उन्हाळी तिळाची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत करावी.
पेरणीसाठी एकरी 1.5 ते 2 किलो बियाणे वापरावे. तिळाचे बियाणे बारीक असल्याने त्यात समप्रमाणात वाळू अथवा गाळलेले शेणखत किंवा माती मिसळून पेरणी करावी.
पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर 30 सेमी व दोन रोपांमधील अंतर 7 ते 8 सेंमी राखावे.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.