तूर पिकातील मररोग नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील मररोग नियंत्रण !
🌱तूर पिकातील मर रोगालाच तूर उभळणे/ उधळणे देखील म्हटले जाते. या रोगाचा प्रादुर्भाव तूर पिकामध्ये रोप अवस्थेपासून ते फुले व शेंगा भरणीपर्यंत कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो. प्रादुर्भाव झाल्यानंतर मर रोग नियंत्रण करणे शक्य नसल्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येते. 🌱प्रादुर्भाव झाल्यानंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक नियोजन करावे. 👉🏻गेल्यावर्षी ज्या शेतात तुरीला मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल त्या शेतात तसेच पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत तूर लागवड करणे टाळावे. 👉🏻पिकांची फेरपालट करून दर तीन वर्षानंतर किमान एकदा तुरीच्या शेतात दुसरे पीक घावे. 👉🏻तूर पीक पेरणी पूर्वी चांगले कुजलेले शेणखत व त्यात एकरी दोन किलो ट्रायकोडर्मा व्हीरीडी हे जैविक बुरशीनाशक मिश्रण करून जमिनीत ओल असताना पेरणीपूर्व द्यावे व वखरणी करून चांगले जमिनीत मिसळून द्यावे यामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांची व ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीची वाढ होते, जमिनीचे तापमान सुस्थितीत राखण्यास मदत होते व मर रोगाला कारणीभूत असणाऱ्या बुरशीचा नायनाट होतो. 👉🏻 जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन मर रोगासाठी प्रतिकारक असलेले वाण लागवडीसाठी निवडावे. 👉🏻पेरणीपूर्वी बियाणास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. 👉🏻 पाण्याचा ताण पडू न देता पाण्याचे योग्य नियोजन करावे. 👉🏻पेरणी झाल्यानंतर शेतात जास्त पाणी साचून देऊ नये. जास्त पाणी झाल्यास चर काढून ते बाहेर काढावे. 👉🏻प्रादुर्भाव दिसू लागल्यास रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी 👉🏻प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी फुलोरा अवस्थेपूर्वी जमिनीतून कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 % डब्लूजी घटक असणारे कूपर-1 @ 500 ग्रॅम आणि कार्बेन्डाझिम 50% डब्लूपी घटक असणारे धानुस्टीन @ 500 ग्रॅम प्रति एकर खातांना चोळून द्यावे. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0
इतर लेख