भात पिकातील तपकिरी तुडतुडे कीड नियंत्रण
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील तपकिरी तुडतुडे कीड नियंत्रण
🌱प्रथम तुडतुड्यांचा रंग वाळलेल्या गवतासारखा असतो, नंतर तो तपकिरी होतो. तुडतुडे आकाराने लहान, तिरकस व भरभर चालीमुळे ओळखता येतात. प्रौढ व पिल्ले धानाच्या बुंध्यातुन व खोडातून सतत रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाड निस्तेज होऊन, सुकून वाळते. प्रादुर्भावग्रस्त शेतात मध्य भागातून गोलाकार खळ्याप्रमाणे शेत जळाल्यासारखे दिसते, यालाच हॉपर बर्न असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि समजा आले तर दाणे न भरताच पोचट राहतात. 🌱नियंत्रणासाठी रोपे शिफारस केलेल्या अंतरावर लावावीत. नत्रयुक्त खतांचा अती वापर करू नये. नत्र सोबत पालाश आणि स्फुरद यांचाही वापर केल्यास फायदा होतो. रासायनिक नियंत्रणासाठी फ्लोनिकॅमीड 50 टक्के @ 60 ग्रॅम किंवा डायनोतेफुरॉन 20% एसजी @60 ग्रॅम प्रति एकर घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
1
इतर लेख