तूर डाळीच्या महागाईवर नियंत्रणासाठी  केंद्र सरकारचा निर्णय !
मंडी अपडेटAgrostar
तूर डाळीच्या महागाईवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा निर्णय !
🌱महागाईमुळे नागरिकांचं घरखर्चाचं बजेट कोलमडलं आहे. एकीकडे खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी पुन्हा त्यांचा खर्च वाढला आहे. मात्र नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत. देशात तूर डाळीचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तूर डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यास आणि राज्यातील सर्व व्यापाऱ्यांनी जमा केलेल्या साठ्याची माहिती सरकारला देण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर राज्यांना सध्याच्या तूर साठ्याचा डेटा ग्राहक व्यवहार विभागाच्या ऑनलाइन मॉनिटरिंग पोर्टलवर अपडेट करावा लागेल. 🌱याशिवाय केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमध्ये ठेवलेली 38 लाख टन डाळ खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या साठ्यात 3 लाख टन हरभऱ्याचाही समावेश आहे. 🌱भाववाढीचं कारण काय? फायनान्शिअल एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार, देशात तूर डाळीच्या उत्पादनात यंदा घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेचे तूर डाळीच्या भाव वाढत आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. खरे तर या राज्यांमध्ये खराब हवामानामुळे खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून तूर दरात वाढ होत आहे. 🌱कृषी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या खरीप पिकांच्या पेरणीच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 47 लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा केवळ 42 लाख हेक्टर क्षेत्रावर तूर पेरणी झाली. अशाप्रकारे तूर लागवड क्षेत्रात मागील हंगामाच्या तुलनेत 11 टक्क्यांनी घट झाली आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या प्राइस मॉनिटरिंग सेलनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून तूर डाळीची किरकोळ किंमत 100 रुपये प्रति किलोच्या आसपास होती, परंतु शुक्रवारी डाळीचे भाव 111 रुपये प्रति किलोवर पोहोचले.यामुळे तूर डाळीच्या किमतीत वाढ झाली आहे. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0
इतर लेख