AgroStar
भात पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची मशागत !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची मशागत !
🌱कोरड्या जमिनीत एक चांगली खोलवर उभी आडवी नांगरट करून चांगले कुजलेले शेणखत मिक्स करावे. नंतर 2 ते 3 वखरण्या करून कचरा व धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे. जमिनीतील कणांतर्गत हवेचे चलनवलन मर्यादित राहण्यासाठी चांगल्या प्रतीची चिखलणी करावी. यासाठी उभी आडवी चिखलणी करून, फळी फिरवून शेतात पाणी सर्व भागात समान पातळीत राहील अशा पद्धतीने पूर्वमशागत करावी. चिखलणी पावर टिलर अथवा पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीने करू शकता. चिखलणी मुळे शेतात पाणी साचून राहते आणि तनांचा नाश होतो. तसेच दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते. चिखलणी करताना जमिनीत खतांची मात्रा द्यावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
2
इतर लेख