AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेती आहे जिवंत कंपनी; शेतकरी तिचा मालक
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेती आहे जिवंत कंपनी; शेतकरी तिचा मालक
मित्रांनो शेतीकडे बघण्याचा प्रेत्तेकाचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. यामध्ये अप्रत्यक्ष शेतीशी निगडीत आणि प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी असे मुख्य दोन प्रवाह आहेत. शेतीशी निगडीत कृषी-पदवीधर तरुण म्हणून माझा दृष्टीकोन याठिकाणी नमूद करतो तो म्हणजे असा- शेती हीच एक जिवंत कंपनीच आहे, कंपनीमध्ये मालकापासून शिपाई पर्यंत विविध, सल्लागार, संचालक, कायदे तज्ञ, विक्री प्रतिनिधी, अकाउंट अधिकारी, निर्माते, गुणवत्ता परीक्षक हे सर्व विभागवार प्रतिनिधी तसेच शिक्षित तज्ञ असतात. परंतु शेती नावाच्या कंपनीत मालक हाच नोकर असतो. पिक कोणते लावणार? त्याची सुधारित जात? त्यासाठी आवश्यक वातावरण, जमीन, पाणी आहे का? त्यासाठी बाजारभाव राहील का? सुरवातीपासून शेवटपर्यंत सगळे निर्णय घ्यायचे ते मालकाने आणि अंमलात अणायचेही त्यानेच. शेती नावाची कंपनी चालवतो म्हणूनच आवश्यक मनुष्यबळासह प्रचंड मोठा धोका पत्करण्याची तयारी ठेऊनच मातीमध्ये लाखो रुपये ओतणारा दिलदार मालक असतो दुसरे तिसरे कुणीही नाही. अगदी 2 रु. किमतीचे पेन 50 पैसे किमतीचे चॉकलेट बनविणाऱ्या कंपनीचे उत्पादन विभाग अतिशय नियंत्रित आणि सुरक्षित ठिकाणी असते, शेती नावाची कंपनीच फक्त बारा महिने उघड्यावर ऊन-वारा-पावसात, आसरा असतो फक्त आभाळाचा! पिकांच्या उत्पादनांना प्राणी, जंगली श्वापदे, चोर-लुटेरे सर्वांचाच धोका. आभाळमायेखाली लाखो-करोडो रुपयांचे उत्पादन उघड्यावर सोडून शांततेची झोप घेणारा हाही मालकच!
उत्पादन घेण्यासाठी अकाउंट विभागाकडे भांडवल न मागता, कुणाही सल्लागाराकडे सल्ला न घेता झालेल्या उत्पादनाची मार्केटिंग जाहिरात न करता मिळेल त्या भावात विक्री करून तारेवरची कसरत करणारा शेतकरी म्हणजेच शेती कंपनीचा मालक. पेनाची साधी 50 पैसे किमतीची रिफील बनवणारा कारखाना त्या उत्पादनाची किंमत ठरवू शकतो तेही योग्य तो नफा गृहीत धरूनच, आणि ‘शेतमाल विकतो तो ग्राहकाने दिलेल्या दामावर नाही ठरत मोल पिकविणाऱ्या मालकाच्या घामावर’. पण म्हणून काही आमचा मालक खचतोय का? नेटाने घाम गळतो आणि येणाऱ्या प्रत्तेक संकटाशी दोन हातही करतो. हे सगळे करण्यास कारण जगाचा पोशिंदा आहे शेतकरी राजा. बुद्धिमान आणि बलवान! जय किसान!
144
0