योजना व अनुदानAgrostar
पीएम श्रम योगी मानधन योजना!
➡️केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील व्यक्ती जसे की रिक्षा चालक, बांधकाम कामगार तसेच रस्त्यावरील विक्रेते इत्यादी लोकांचा यामध्ये समावेश होतो. पीएम श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून सरकारद्वारे अशा व्यक्तींना किंवा कामगारांना पेन्शनची हमी देण्यात येते.
➡️यामध्ये दररोज दोन रुपये जमा करून वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळणे शक्य आहे. जर आपण या योजनेचे सगळे स्वरूप समजून घेतले तर लक्षात येते की, ही योजना सुरू केल्यानंतर प्रत्येक महिन्याला 55 रुपये जमा केले तर म्हणजे दररोज दोन रुपयापेक्षा कमी पैसे यामध्ये जमा करणे गरजेचे असून या योजनेत वयाच्या 18 व्या वर्षी दररोज जवळपास दोन रुपये जमा केल्यास वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळणे शक्य आहे.
➡️समजा एखाद्या व्यक्तीने त्याच्या वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला प्रत्येक महिना दोनशे रुपये जमा करणे गरजेचे असून साठ वर्षानंतर त्याला पेन्शन मिळू लागेल व महिन्याला तीन म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन मिळेल.
➡️योजनेकरिता रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत:
तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये कामगार पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकतात. यासाठी या योजनेचे एक वेब पोर्टल असून या माध्यमातून ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँकेचे बचत खाते पासबुक आणि आधार कार्ड असणे आवश्यक असून 18 वर्षे कमी आणि 40 वर्ष पेक्षा जास्त वय नसावे.
➡️योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी क्लिक करा: https://maandhan.in/shramyogi
➡️संदर्भ :Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.