AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेती विकत घेण्यासाठी मिळते अनुदान!
योजना व अनुदानAgrostar
शेती विकत घेण्यासाठी मिळते अनुदान!
➡️महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या शेतकर्यांकडे स्वतःची जमीन नाही, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत अश्या शेतकर्यांसाठी राज्य सरकारकडून शेतजमीन खरेदी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. याचा अनेकांना फायदा होत आहे. ➡️यामध्ये 'कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना २०२२' असे राज्य शासन राबवित असलेल्या या योजनेचे नाव असून या योजनेनुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून जमिन खरेदी करण्यासाठी ५० टक्के बिनव्याजी कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाते. यामध्ये चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा. योजनेसाठी परित्यक्ता, विधवा स्त्री यांना प्राधान्य देण्यात येते. महसूल व वन विभागाने ज्याना शेतमजूर अथवा शेतकऱ्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले गेले आहे, त्या शेतकरी कुटुंबांस या योजनेचा लाभ मिळणार नाही. ➡️योजनेतील लाभार्थ्यास दिले जाणारे कर्ज हे बिनव्याजी असून त्या कर्जाची मुदत १० वर्षे असणार आहे. घेतलेल्या कर्जाच्या कर्जफेडीची सुरुवात ही कर्ज मंजुरीच्या दोन वर्षांनंतर सुरू होईल. ➡️योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : १.जातीचे प्रमाणपत्र २.रहिवाशी दाखला ३.रेशन कार्डची झेरॉक्स ४.आधार कार्डची झेरॉक्स ५.निवडणूक ओळखपत्र ६.तहसीलदार यांनी निर्गमित केलेला भूमिहीन असल्याबाबतचा दाखला ७.तहसीलदार यांनी दिलेला मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ८.शाळा सोडल्याचा दाखला. ९. लाभार्थ्याचे १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र ➡️ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून त्याच कार्यालयाकडे हा अर्ज विहित नमुन्यात सादर करावा लागणार आहे. ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
13
इतर लेख