कृषी वार्ताAgrostar
रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी!
➡️सरकार देशभरातील शिधापत्रिकाधारकांना अनेक सुविधा देत असून, त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. यासोबतच कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत कोट्यवधी लोकांना सरकारने मोफत रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लोकांना त्याचा लाभ दिला जात आहे.
➡️शिधापत्रक धारकासाठी सरकारने 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच सरकारने मोफत रेशनसोबत तेल आणि मीठाची पाकिटेही मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले. म्हणजेच यापुढे ग्राहकांना अधिकाधिक गहू आणि तांदूळाचा लाभ मिळणार आहे.
➡️अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर, सामान्य शिधापत्रिकाधारकांना फक्त 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मिळेल. मात्र यावेळी कार्डधारकांना गव्हासाठी किलोमागे 2 रुपये आणि तांदळासाठी 3 रुपये प्रतिकिलो खर्च करावा लागणार आहे.
➡️ ज्या शिधापत्रिकांकडे मीठ, तेल, हरभरा यांची पाकिटे शिल्लक असतील, त्यांना शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय कार्डधारकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हा नियम पाळला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
➡️संदर्भ :Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.