'मावा' किडीची ओळख, जीवनचक्र, नुकसानीचा प्रकार आणि उपाय!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
'मावा' किडीची ओळख, जीवनचक्र, नुकसानीचा प्रकार आणि उपाय!
• बहुतेक सर्व पिकावर मावा या सूक्ष्म किडीचा प्रादुर्भाव आढळतो. • कोवळी पाने,शेंडे यावर प्रामुख्याने दिसते. • या किडीच्या जगभरात ४००० वर प्रजाती आहेत. • हिरवट तपकिरी, काळी क्वचित लाल रंगाची ही कीड २ मिमि पासून १० मिमी पर्यंत असते. • आपल्याकडे २५० पर्यंत प्रजाती आढळतात. • यांचे प्रजनन संयोगाविना आणि संयोगातून दोन्ही प्रकारे होते. • मादीला पंख नसतात तर नराला पंख असतात. • पानाचा रस शोषून घेत ही कीड गोड चिकट स्त्राव सोडत असते. • तो खाण्यासाठी मुंग्या येतात त्यावर स्वार होऊन या किडीचा प्रसार एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होतो. • मुंगळे मात्र ही कीड फस्त करतात. • त्यामुळे ज्या शेतात मुंगळे अधिक आहेत तेथे ही कीड नियंत्रणात राहते. • एक आठवड्यात पिलांची वाढ पूर्ण होऊन जीवनमान २/३ आठवडे असते. • पानाच्या मागील बाजूस यांचे वास्तव्य असते. नियंत्रण- 👉 इमिडाक्लोप्रीड, डायमेथोएट, फोस्फोमिडन, थायोमेथॉक्झामची फवारणी करतात. 👉 सेंद्रिय उपाय म्हणून गोमुत्र आणि निंबोळी अर्काची एकत्रित फवारणी केल्यास कीड नियंत्रणात राहते. 👉 कीड वेगाने वाढत असल्याने पिकाची वाढ खुंटते,पाने दुमडली जातात. 👉 भाजीपाला, कडधान्य, भरड धान्य, अन्न धान्य, तेल बिया अशा सर्व प्रकारच्या पिकावर ही कीड आढळते. ` संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
76
17
इतर लेख