कोबी पिकातील अळीचे व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोबी पिकातील अळीचे व्यवस्थापन!
या किडीचा पतंग पानकोबी तसेच सर्व कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पिवळसर राखी रंगाची अंडी घालतो. त्यातून फिकट हिरव्या किंवा भुरकट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात.या अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाचा पृष्ठभाग खरडून खातात. त्यामुळे पानावर असंख्य छिद्रे पडून पान चाळणीसारखे दिसते. पानांना फक्त शिराच शिल्लक राहतात. नियंत्रण:- 👉 या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मीक नियंत्रण व्यवस्थापन करावे. लागवडीपूर्वी मुख्य पिकात आणि कडेने मोहरी पेरावी. 👉 मोहरीवर अळ्या दिसू लागताच, क्लोरपायरीफॉस (२० इसी) १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी. 👉 मुख्य पिकावर अळी दिसू लागताच, पहिली फवारणी बॅसेलिस थुरींजिऐंसीस जीवाणू आधारित कीटकनाशकाची @१ ग्रॅम प्रति लिटर किंवा निंबोळी अर्क ४% किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. 👉 तसेच अधिक प्रादुर्भाव आढळून आल्यास क्‍लोरअ‍ॅन्ट्रानिलीप्रोल १८.५% एससी @६० मि.लि. प्रति एकर फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
21
5
इतर लेख