केळी पिकातील सिगाटोका समस्या!
गुरु ज्ञानतुषार भट
केळी पिकातील सिगाटोका समस्या!
🌱गेल्‍या काही वर्षात केळीवर सीगाटोका रोग मोठया प्रमाणावर येत असुन या रोगामुळे केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट होते.तसेच रोगग्रस्त झाडावरील फळांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. 🌱रोगाची लक्षणे : १. प्रथम पानावर लहान पिवळे ठिपके येतात. २. हे पिवळे ठिपके ३ ते ४ मि. मी. लांब व १ मि. मी रुंद आकाराचे होतात. ३. असे लांबट झालेले ठिपके कालांतराने रंगाने तपकिरी, काळे होऊन वाढतात व लांबट गोलाकार होतात. पुर्ण वाढ झालेल्या ठिपक्यांची लांबी १२ ते १५ मि. मी. आणि रुंदी २.५ ते ३. मि. मी. एवढी असते. ४. पुर्ण वाढ झालेल्या ठिपक्याभोवती पिवळी वलये तयार होतात. ५. शेवटी ठिपके मध्य भागापासुन राखी रंगाचे होऊन त्यांच्या कडाच फक्त काळपट राहतात. ६. ठिपक्यांची संख्या जास्त असेल तर ती वेगवेगळी ओळखता येत नाहीत आणि अशी रोगग्रस्त पान फाटतात, करपतात व झाडावर देठापासुन मोडुन लोंबकळतात. ७. रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर, तीव्र असेल तर केळी भरत नाहीत. अपरिपक्व पिकतात आणि घडातुन गळु लागतात. अपरिपक्व पिकलेल्या फळाचा गर पिवळसर होतो व त्याची चव तुरट बनते. 🌱रोगाचे व्‍यवस्‍थापन : 👉🏻हा रोग एकात्मिक रोग नियंत्रण तंत्राच्या अवलंबनाने नियंत्रित होऊ शकतो. मशागतीत योग्य फेरपालट, रोगग्रस्त पानाचा नाश व योग्य बुरशीनाशकाचा वापर केल्याने रोगाचे व्‍यवस्‍थापन करता येऊ शकते. 👉🏻लागवड करताना दोन झाडांमधील अंतर योग्य असावे. 👉🏻तसेच तणनियंत्रण योग्य रीतीने करावे. 👉🏻रोग ग्रस्त झाडाची पाने शेतापासून लांब नेवून जाळून टाकावी. 👉🏻योग्य नियंत्रणासाठी फवारणीमधून मँडोझ हे बुरशीनाशक २ ग्रॅम / लिटर किंवा धानुस्टीन १ ग्रॅम / लिटर किंवा पॅनका एम ४५ हे औषध २.५ ग्रॅम/ लिटर द्यावे. 👉🏻जर सिगाटोका चा जास्त प्रधुरभाव दिसत असेल तर या औषधाची आलटून पालटून फवारणी करावी.
13
6
इतर लेख