AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उद्यानविद्याअन्नदाता कार्यक्रम
आवळा, पेरूच्या नवीन बागेची लागवड
नवीन बागेची लागवड शक्यतो एप्रिल-मेमध्ये करावी. आवळा आणि पेरूसाठीचे खड्डे १ * १ * १ मीटर असावेत. दोन रोपांमधील अंतर ६*६ मीटर ठेवावे. खड्डे खोदल्यानंतर एक ते दीड महिन्यांपर्यंत खड्डे उघडे ठेवा, त्यामुळे जमिनीत असलेली बुरशी आणि किडींचा नाश होतो. यानंतर चांगले कुजलेले शेणखत ३० किलो, २ किलो एसएसपी, १ किलो एमओपी, ५०० ग्रॅम बोरॉन इत्यादी चांगले एकत्र मिसळून खड्ड्यांत भरावे. पाऊस सुरू होण्यापूर्वी झाडे लावावीत.
संदर्भ:- अन्नदाता हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
85
0