AgroStar
हळदी पिकामध्ये भर लावण्याचे महत्व जाणून घ्या.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळदी पिकामध्ये भर लावण्याचे महत्व जाणून घ्या.
➡️शेतकरी बंधूंनो,आले पिकामध्ये गादी वाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साह्याने किंवा दोन गादीवाफ्यांमधील जागेतील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. यामुळे मजुरांच्या खर्चात बचत होते. ➡️भरणी न केल्यास हळदीचे फुटव्यांपासून नव्याने आलेली हळकुंडे उघडी राहतात. सूर्यप्रकाशात हळकुंड आल्यास ते हिरवे पडतात आणि त्यांची वाढ खुंटते. ➡️तसेच उघड्या राहिलेल्या हळकुंडावर वा गड्डयांवर कंदमाशी सारख्या किडी अंडी घालतात, त्यामुळे कंदकुज रोगाचाही प्रसार होतो. ➡️गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करतेवेळी ड्रिपर मातीखाली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ➡️ हे टाळण्यासाठी मजूर अथवा भरणी यंत्राने तत्काळ मातीची भर लावून हळकुंडे संपूर्णपणे झाकून घ्यावीत. हळकुंडांचे चांगले पोषण होते. यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2
इतर लेख