AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर!
कृषि वार्ताtv9marathi
खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर!
➡️ केंद्र सरकारने बुधवारी बाजार सत्र 2021-22 साठी खरीप पिकांवर एमएसपी (किमान आधारभूत किंमत) वाढविण्यास परवानगी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत एमएसपीमध्ये सर्वाधिक तिळ 452 ​​रुपये प्रति क्विंटल वाढ झाली असल्याचे केंद्राने म्हटले आहे. त्यानंतर तूर आणि उडीद यांची 300 रुपये प्रती क्विंटल वाढ झाली आहे. ➡️ ही माहिती देताना केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, केंद्र सरकारने खरीप पिकांवर एमएसपी 50 टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, गेल्या सात वर्षांपासून केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेत असून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नेहमी तयार आहे. ➡️ तोमर म्हणाले की, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर गतवर्षीच्या तुलनेत धानाचा किमान आधारभूत दर 72 रुपये वाढून 1940 रुपयांवर आला आहे. ते म्हणाले की मागील वर्षी ही रक्कम प्रति क्विंटल 1868 रुपये होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एमएसपी हा दर आहे ज्याद्वारे सरकार शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी करते ➡️ त्याचबरोबर केंद्र सरकारच्या या निर्णयावर कॉंग्रेसने म्हटले आहे की, शेतकरी आंदोलन संपविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तीनही नवीन कृषी कायदे मागे घेणे. देशातील मुख्य विरोधी पक्षाने हे कायदे भयावह असल्याचे म्हटले आहे. सरकारने आपला आग्रह सोडून द्यावा आणि शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे म्हटले आहे. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
5
इतर लेख