पाहा, स्ट्रॉबेरी लागवडीच्या महत्त्वपूर्ण बाबी
सल्लागार लेखअॅग्रो संदेश
पाहा, स्ट्रॉबेरी लागवडीच्या महत्त्वपूर्ण बाबी
समशीतोष्ण प्रदेशात स्ट्रॉबेरीची लागवड प्रभावीपणे करता येते; हिवाळ्यात मैदानी प्रदेशात फक्त एकच पीक घेता येते. समशीतोष्ण प्रदेशात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतलेली पिकांची फळे फेब्रुवारी-मार्चमध्ये तयार होतात. स्ट्रॉबेरीचे वाफे डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान प्लास्टिकच्या मल्चिंग पेपरने झाकलेले असतात, ज्यामुळे त्यांचे फळ वेगाने वाढण्यास मदत होते आणि उत्पादन देखील २० टक्क्यांनी वाढते. लागवड: स्ट्रॉबेरी बियाणे आणि धावत्या मुळ्यांपासून (रनर्स) लागवड केली जाते; लवकर उत्पादन व चांगल्या प्रतीची फळे मिळण्यासाठी धावत्या मुळांपासून लागवड करावी. ऊती संवर्धनापासून तयार केलेल्या रोपांपासून देखील लागवड करू शकता. सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत स्ट्रॉबेरी लागवड करावी. ही लागवड ३०/३० सेमी किंवा ६०/६० सेमी अंतरावर केली जाते. रोपांची पुर्नलागवड करताना रोपांची जुनी सुकलेली पाने काढून टाकावीत. खत व पाणी व्यवस्थापन: माती आणि हवामानाच्या प्रकारावर अवलंबून सिंचनाची योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे, दररोज ठिबक सिंचनाद्वारे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ४० मिनिटे (सकाळी २० मिनिटे व संध्याकाळी २० मिनिटे) पाणी चालवावे. पिकाच्या आवश्यकतेनुसार ही वेळही वाढू किंवा कमी होऊ शकते. वेगवान फळांच्या उत्पादनाचे स्वरूप असल्यामुळे स्ट्रॉबेरीला जास्त खत हवे असते. तयार बेडमध्ये दोन किलो शेणखत आणि २० ग्रॅम डीएपी प्रति चौरस मीटर मिसळले जाते. नायट्रोजन फॉस्फरस, पोटॅश आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये पुरविणारी कोणतीही विद्रव्य खत दर आठवड्याला ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश अनुक्रमे ५०:२५:३५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. संदर्भ - अॅग्रो संदेश
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
163
1
इतर लेख