जनधन खातेधारकांनो ! घरी बसून तपासा आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम.
कृषि वार्ताकृषि जागरण
जनधन खातेधारकांनो ! घरी बसून तपासा आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम.
👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी जनधन योजनेला नागरिकांना मोठा प्रतिसाद दिला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असावे, यासाठी ही योजना २८ ऑगस्ट २०१४ मध्ये सुरू करण्यात आली. 👉अनेकांनी या योजनेतून बँकेत खाते उघडले आहे. पण आपण पाहतो की बहुतेक जनधन खातेधारक बँक बॅलन्स पाहण्यासाठी बँकेत जातात. परंतु तुम्ही तुमच्या खात्याचा बँक बॅलन्स घरी बसून पाहू शकतात. एक मिस कॉल देऊन तुमच्या खात्यात बॅलन्स तपासू शकता. 👉आपल्या खात्यातील बचत कशी तपासावी याची माहिती या लेखात घेऊ. एसबीआय ग्राहक असा तपासा बँक बॅलन्स स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी ही खास सुविधा तयार केले आहे. कोणताही जनधन खाते धारक १८००४२५३८०० किंवा १८००११२२११ या नंबर वर मिस कॉल देऊन आपला बॅलन्स चेक करू शकता. यासाठी ग्राहकांनी आपल्या बँकेत रजिस्टर मोबाईल नंबर वरून एक कॉल करावा लागेल. कॉल केल्यानंतर तुमच्या शेवटच्या पाच ट्रांजेक्शन बद्दल माहिती दिली जाते. याशिवाय तुम्ही ९२२३७६६६६६ या नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असा चेक करा तुमचा बॅलन्स पीएनबी बँकेचे जनधन खाते धारक आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून १८००१८०२२२३ किंवा ०१२०२३०३०९० ह्या नंबर वर मिस कॉल देऊन बॅलन्स विषयी माहिती घेऊ शकता. या नंबरवर मिस कॉल दिल्यानंतर तुमच्या खात्यात बॅलन्स विषयीचा मेसेज तुम्हाला येतो. याशिवाय तुम्ही BAL (space) १६ अंकी अकाउंट नंबर नोट करून ५६०७०४० या नंबरवर मेसेज करून माहिती घेऊ शकता. बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी बँक ऑफ इंडिया ची जनधन खाते धारक आपला बॅलन्स चेक करण्यासाठी ०९०१५१३५१३५ या नंबर वर मिस कॉल देऊन आपल्याला विषयी माहिती घेऊ शकता. इंडियन बँकेचे ग्राहकांसाठी इंडियन बँकेचे ग्राहक आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून १८००४२५००००० मिस कॉल देऊन आपल्या खात्या विषयी माहिती घेऊ शकता. किंवा ९२८९५९२८९५ नंबरवर कॉल करून आपले खाते विषयी माहिती घेऊ शकता. संदर्भ -कृषि जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
107
16
इतर लेख