हरभरा पीक पेरणी विषयक माहिती
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पीक पेरणी विषयक माहिती
➡️खरिफ पिकाच्या काढणीनंतर यापुढे हरभरा पिकाच्या पेरणीस सुरुवात होईल. हरभरा पिकास थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असेलेले वातावरण मानवते. ➡️मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या पाण्याचा होणाऱ्या जमिनीत हरभरा पिकाचे उत्पादन चांगले येते. ➡️देशी वाणांच्या पेरणीसाठी विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम यांसारख्या वाणांची निवड करावी व काबुली वाणांसाठी विराट आणि कृपा हे वाण वापरावे. ➡️हरभरा पिकाची पेरणी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत करावी. सपाट वाफ्यावर पेरणी ही पेरणी यंत्राद्वारे करावी. तसेच सरी वरंभा असल्यास बियाणे टोबून पेरणी करावी. ➡️पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर 30 सेंमी व दोन बियांमधील अंतर 10 सेंमी ठेवावे. पेरणी साठी एकरी 30 ते 40 किलो बियाणे वापरावे. ➡️हरभरा पिकास मर रोगाची समस्या मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे जमिनीतील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणी पूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठी विटावॅक्स पॉवर @ 3 प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. ➡️सुरुवातीला पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि फुटव्यांसाठी पेरणीकरतेवेळी जमिनीतून एकरी डीएपी 50 किलो, युरिया 25 किलो सोबतच सफेद मुळींच्या विकासासाठी व पिकाच्या जोमदार वाढीसाठी पॉवर ग्रो भूमिका 4 किलो द्यावे. ➡️हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील आहे त्यामुळे पिकास जास्त काळ पाण्याचा ताण देऊन अचानक जास्त पाणी दिल्यामुळे आणि जमिनीत जास्त काळ पाणी साचून राहिल्याने पिकास मूळकूज रोग होऊन पीक उभळण्याची समस्या येते. यासाठी पिकास हलक्या जमिनीत 3 वेळा आणि भारी काळ्या जमिनीत 2 वेळा पाणी द्यावे. ➡️पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी आणि 30 दिवसांचे झाल्यानंतर दुसरी कोळपणी करावी आणि नंतर गरजेनुसार खुरपणी करावी. यामुळे तण नियंत्रण होऊन जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते. ➡️घाटे अळी हरभरा पिकातील मुख्य कीड आहे यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येते. अळीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ➡️हरभरा पेरणी वेळीच ज्वारी अथवा मका प्लॉटचा मध्ये सापळा पीक म्हणून पेरल्यास पक्षी थांबे म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो ज्याद्वारे घाटे अळीचे नियंत्रण करता येईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
10
इतर लेख