दहावी पास विद्यार्थ्यांना मिळेल 3 लाखांचे पॅकेज! लगेच करा 'या' कोर्सला अप्लाय !
नोकरी आणि शिक्षणAgrostar
दहावी पास विद्यार्थ्यांना मिळेल 3 लाखांचे पॅकेज! लगेच करा 'या' कोर्सला अप्लाय !
➡️दहावीला साधारण मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते. या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही कामाची बातमी आहे.दहावीमध्ये 40 ते 60 टक्के मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षण काय घ्यावं हा मोठा प्रश्न असतो. विशेषत: हे विद्यार्थी ग्रामीण भागातील तसंच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील तर त्यांच्यासाठी हा प्रश्न आणखी गंभीर बनतो. आपली मुलं लवकरात-लवकर हाताशी यावं अशी या पालकांची अपेक्षा असते. या मुलांना रोजगार मिळवून देणारा एक चांगला कोर्स पुण्यात उपलब्ध आहे. ➡️आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारनं Minimum Competency and Vocational Courses (MCVC) या कोर्सची निर्मिती केली आहे. पुण्यातील लक्ष्मणराव आपटे प्रशालेमधील (Laxman Rao Apte Junior College, Pune) एमसीव्ही हा विभाग चांगलाच प्रसिद्ध आहे. आपटे प्रशालेत कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ट्रॅव्हल टुरिझम आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हे तीन अभ्यासक्रम एमसीव्हीसीच्या माध्यमातून आज उपलब्ध आहेत. ➡️या विभागातील कोर्स सामान्य किंवा कमकुवत आर्थिक गटातील विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून केले आहेत. त्यामुळे त्याची वार्षिक फी ही 2400 रूपये इतकी असून साहित्य फी 1100 रूपये आहे. आपटे प्रशालेकडून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचाही प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर त्यांचे शिक्षण सुरू असताना अनुभव येण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी इंटर्नशिपसाठी पाठवले जाते. ➡️कोर्सचे फायदे काय : ट्रॅव्हल टुरिझम हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. केसरी टूर्स, दिशा टुरिझम, गौरीशंकर टुरिझम या प्रसिद्ध ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ते नोकरी करत आहेत. तर काही जणांनी स्वत:चा पर्यटन व्यवसाय देखील सुरू केला असून त्या माध्यमातून त्यांनी रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकलंय. ➡️कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील विद्यार्थी सुद्धा वेगवेगळ्या सरकारी ऑफिसमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांची स्वतःची सेवा देत आहेत. तसेच वेगवेगळ्या बिल्डर्ससोबतही त्यांना काम करता येते. हा कोर्स करून त्यांना वर्षाला 3 लाखापर्यंतचे पॅकेज मिळू शकते. ➡️किती फी आहे : या कोर्सचा कालावधी हा एक वर्षाचा असून अभ्यासक्रमाची फी सुद्धा कमी आहे. या कोर्सची वार्षिक फी 2400 रूपये तर साहीत्य फी 1100 रूपये आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
15
इतर लेख