AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जाणून घ्या ! काय आहे सापळा पिकाचे महत्व
सल्लागार लेखकृषी जागरण
जाणून घ्या ! काय आहे सापळा पिकाचे महत्व
एकात्मिक कीड नियंत्रणाचा मार्ग आजच्या काळात महत्त्वाचा झालेला आहे . एकात्मिक कीडनियंत्रणातील महत्त्वाचा घटक म्हणून सापळा पिकाचे महत्व आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. सापळा पीक म्हणजे काय? मुख्य पिकांमध्ये किडीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावली जाते. या पिकाकडे कीड आकर्षित होते व परिणामी मुख्य पिकावरील किड कमी होण्यास मदत होते व पीकसंरक्षण होते अशा पिकास सापळा पीक म्हटले जाते. सापळा पीक वापरण्याची तत्वे १) सापळा पीक किडींना आकर्षित करणारे असावे. २) मुख्य पिकाच्या शेतातील कालावधीत सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावेत. ३) सापळा पिकावरील किडी चे अंडीपुंज व किडी गोळा करून नष्ट करावे. ४) सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे. किंवा त्यावर कीटकनाशकाची फवारणी करावी. सापळा पिकाचे फायदे १)कीडनाशकाचा वापर कमी होतो. २) मित्र कीटकांचे संवर्धन होते. ३) पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो. ४) पर्यावरणाचे संरक्षण होते. ५) सापा पिकातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.
संदर्भ:- कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
87
12
इतर लेख