AgroStar
काकडी वर्गीय पिकातील मोझॅक व्हायरस नियंत्रण.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
काकडी वर्गीय पिकातील मोझॅक व्हायरस नियंत्रण.
➡️काकडीवर्गीय पिकात मोसाइक हा विषाणूजन्य रोग आढळून येतो. याच्या प्रादुर्भावामुळे पानांवर तसेच फळांवर गडद हिरव्या आणि फिक्कट हिरव्या रंगाचे चट्टे आढळून येतात तसेच झाडाची वाढ खुंटणे, फुलधारणा न होणे, फळांची गुणवत्ता खालावणे अश्या समस्या येतात. हा विषाणूजन्य रोग पिकात आल्यावर तो नियंत्रणात येत नाही मात्र हा रोग मावा ह्या किडीमुळे पसरला जातो. त्यामुळे पीक लागवड केल्यावर सुरुवातीला पिकात पिवळे व निळ्या चिकट सापळ्यांचा वापर कीड नियंत्रणासाठी करावा.तसेच किडीचा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास मेंटो ०.६ ग्रॅम /लिटर व निम तेल २मिली / लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारावे. ➡️संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
3
इतर लेख