AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लिंबू वर्गीय पिकातील नागअळीचे नियंत्रण!
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबू वर्गीय पिकातील नागअळीचे नियंत्रण!
• लिंबू वर्गीय रोपवाटिकेमध्ये का किडीचा अधिक प्रादुर्भाव आढळून येतो. • अळी फिकट पिवळ्या आणि हिरव्या रंगाची असते. • हि अळी पानांमध्ये प्रवेश करून आतील हरितद्रव्ये खाते. त्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या पानांवर पांढरट पारदर्शक नागमोडी वलय दिसून येतात. • हि अळी जिवाणूजन्य सिट्रस कॅन्कर रोगाचे वहन करते. • या अळीच्या प्रादुर्भावामुळे पाने गुंडाळली जातात. अशा पानांमध्ये इतर किडीदेखील प्रादुर्भाव करतात. • नवीन फांद्या/फूट आल्यानंतर झाडांची छाटणी करू नये. हिवाळ्यामध्ये फक्त एकदाच छाटणी करावी. • जुन्या पानांवर याचा प्रादुर्भाव कमी दिसतो. • नायट्रोजन युक्त खतांचा वापर कमी प्रमाणात करावा. • ठिबक सिंचन सुविधा असणाऱ्या बागेमध्ये या अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. • रोपवाटिकेमध्ये अशी प्रादुर्भावग्रस्त रोपे आढळल्यास ती काढून नष्ट करावीत. • तसेच नियंत्रणासाठी प्रति एकरी ५ फेरोमोन सापळे लावावे. • पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी निमार्क @२०-३० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • अधिक प्रादुर्भाव असल्यास इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @५ मिली किंवा मिथाइल-ओ-डिमेटोन २५ ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
संदर्भ : अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सीलेंस_x000D_ _x000D_ आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेयर करा.
74
11
इतर लेख