agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस, मूग,उडद  पिकांसाठी कृषी सल्ला!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
कापूस, मूग,उडद पिकांसाठी कृषी सल्ला!
पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात मित्र कीटकांची संख्या भरपूर प्रमाणात असते. परिणामी हानिकारक किडींची संख्या नियंत्रणात राहते. या काळात रासायनिक कीडनाशकांची फवारणी केल्यास मित्र कीटकांची संख्या कमी होण्याचा धोका असतो. कापूस पाते लागणे - रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंबयुक्त किटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) २ ते ३ मिलि) या प्रमाणे फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळीच्या आर्थिक नुकसान पातळीच्या निरीक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात मित्र कीटकांची संख्या भरपूर प्रमाणात असते. परिणामी हानिकारक किडींची संख्या नियंत्रणात राहते. या काळात रासायनिक कीडनाशकांची फवारणी केल्यास मित्र कीटकांची संख्या कमी होण्याचा धोका असतो. मूग/ उडीद खोडमाशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड (१७.८ % प्रवाही) २ मिलि प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. मका खोडकिडीच्या नियंत्रणासाठी, डायमेथोएट (३०% प्रवाही) १.५ मिलि प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
11
इतर लेख