AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीचे जीवनचक्र!
किडींचे जीवनचक्रतमिलनाडु अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी
भेंडी पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीचे जीवनचक्र!
हि कीड अनेक पिकावर उपजीविका करून पिकांचे नुकसान करते. तर सध्या आपण या किडीचा जीवनक्रम, कालावधी, हानिकारक अवस्था यांबद्दल जाणून घेणार आहोत. नुकसान होण्याची लक्षणे:- या किडीचे अळी फुले खाते तसेच फळांवर छिद्र पडून आतील भाग खाते. यामुळे फळांवर विकृती येऊन फळांची प्रत खराब होते व उत्पादनात घट येते. किडीची ओळख:- • या किडीची अंडी गोलाकार आणि मलईदार पांढर्‍या रंगाची असतात. • अळी हिरव्या आणि तपकिरी रंगामध्ये आढळून येते. • कोष अवस्था तपकिरी रंगाची असून माती, पाने आणि शेंगांमध्ये आढळते. • प्रौढ: मादी तपकिरी पिवळसर तर नर पतंग हा 'V' आकाराच्या खुणा असलेला फिकट हिरव्या रंगाचा असतो. नियंत्रण:- • प्रादुर्भावग्रस्त फळे एकत्र करून नष्ट करावीत. • प्रौढ पतंगांना आकर्षित करण्यासाठी पिकाभोवती किंवा पिकामध्ये काही ओळी झेंडू किंवा टोमॅटो पिकाच्या लावाव्या. यामुळे मुख्य पिकावर अंडी खळण्याचे प्रमाण कमी होते. • प्रति एकरी ६ फेरोमन सापळे बसवावे. • तसेच बॅसिलस थुरिंजेनेसिस @२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • फळांची तोडणी करण्यापूर्वी फवारणी करू नये.
संदर्भ:- तामिळनाडू अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी_x000D_ _x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
1