विविध पिकातील लाल व पिवळा कोळी किडीचा प्रादुर्भाव आणि नियंत्रण!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
विविध पिकातील लाल व पिवळा कोळी किडीचा प्रादुर्भाव आणि नियंत्रण!
• कोरडे हवामान हे कोळीच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे वातावरणात ६० टक्क्यांपेक्षा कमी आद्रता असल्यास याचा प्रादुर्भाव जास्त होतो. • पावसाळा संपल्यानंतर कोळी कीड नियंत्रित ठेवणे अवघड जाते. लक्षणे: • हि कीड नवीन पानांमधील तसेच नवीन वाढणाऱ्या शेंड्यामधील रस शोषून घेते. त्यामुळे झाडाची पाने खालच्या बाजूने झुकून चुरगळली जातात व पानांना उलट्या होडीचा आकार येतो. • झाडाची व फळांची वाढ खुंटली जाते तसेच फुलगळ होते व फळांच्या देठावर पानांवर लालसर तपकिरी रंगाचे डाग पडतात व नंतर गळ होते. • लाल कोळी हे झाडावर जाळे तयार करते. त्यामुळे जोपर्यंत कोळीचे जाळे नष्ट होत नाही तोपर्यंत लाल कोळी नियंत्रित होत नाही. • पाउस आणि आद्रता या किडीला त्रासदायक असते. लाल कोळीचा प्रादुर्भाव होणारी पिके: • मिरची, वांगी, भेंडी, टोमॅटो, गुलाब, वेलवर्गीय पिके, कापूस, द्राक्षे, नारळ, डाळिंब, लिंबूवर्गीय फळपीक तसेच फुल व फळ पिकांमध्ये याचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रण: • यावर उपाययोजना म्हणून लाल कोळी साठी कीटकनाशकाची फवारणी करताना जास्तीत जास्त पाण्याचा वापर करावा. जेणेकरून किडीचे जाळे धुवून निघेल व कीड नियंत्रित होईल. • पिकास अतिरिक्त नत्र देवू नये • वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे. कोळी नियंत्रणासाठी साठी वापरली रसायने: • सल्फर ८० WP @ २ ग्रॅम प्रति लिटर, स्पायरोमेसीफेन २२.९ % एससी @ १ मिली प्रति लिटर, प्रॉपरगाईट ५७ % ईसी @ २ मिली प्रति लिटर यांसारख्या औषधांचा वापर करावा. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
7
इतर लेख