गुरु ज्ञानAgrostar
बाजरी पिकातील विरळणी आणि आंतरमशागत!
🌱बाजरी पिकामध्ये रोपांची संख्या योग्य प्रमाणात राखण्यासाठी विरळणी करणे खूप गरजेचे असते. पहिली विरळणी ही पेरणी केल्यानंतर 10 दिवसांनी तर गरजेनुसार दुसरी विरळणी पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी करावी. तसेच बाजरी पिकामध्ये खुरपणी करून तण नियंत्रण करणे देखील खूप गरजेचे आहे, कारण सुरुवातीच्या काळामध्ये पीक आणि तण यांच्यामध्ये
सूर्यप्रकाश, हवा, पाणी आणि अन्नद्रव्ये यासाठी स्पर्था होत असते. सुरुवातीच्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये 1 खुरपणी आणि 1 कोळपणी करावी. पीक तणविरहित ठेवावे.
🌱संदर्भ: Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.