गुलाब पिकातील फुलकिडींच्या नियंत्रणासाठी 'ही' प्रक्रिया करावी.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
गुलाब पिकातील फुलकिडींच्या नियंत्रणासाठी 'ही' प्रक्रिया करावी.
गुलाब पिकामध्ये फुलकिडींच्या प्रादुर्भावामुळे पानांवर तपकिरी रंगाचे डाग दिसू लागतात तसेच फुलधारणा होण्यास अडथळा येतो. याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेल्या कोंबापासून ५ ते ६ सेंटीमीटर खालून फांद्या छाटाव्या आणि नष्ट कराव्या. तसेच निमतेल @५० मिली किंवा निमार्क (१% ईसी) @२० मिली/ (०.१५% ईसी) @४० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
169
20
इतर लेख