हरभरा दरवाढीचे संकेत!
समाचारअ‍ॅग्रोवन
हरभरा दरवाढीचे संकेत!
➡️ मागील वर्षी देशात ९३ लाख टन हरभऱ्याचा देशात वापर झाला होता. यंदाही वापर तेवढाच राहण्याचा अंदाज असून, पुरवठ्यात तूट येण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे यंदा हरभरा दर हे हमीभावाच्या पुढे जातील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. ➡️ पुणे:- देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये यंदा पाऊस, वाढती उष्णता आणि कीड-रोगांमुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादन ८५ लाख टनांच्या जवळपास राहिल. मागील वर्षी देशात ९३ लाख टन हरभऱ्याचा देशात वापर झाला होता. यंदाही वापर तेवढाच राहण्याचा अंदाज असून, पुरवठ्यात तूट येण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे यंदा हरभरा दर हे हमीभावाच्या पुढे जातील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. आयग्रेन इंडियाच्या वेबिनारमध्ये विविध क्षेत्रातील जाणकारांनी देशातील हरभरा पिकाच्या स्थितीविषयी माहिती दिली. ➡️ महाराष्ट्रात पेरणी वाढली, उत्पादकता घटली राज्यात यंदा २२.९४ लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले. यंदा लागवड क्षेत्रात पाच टक्के वाढ झाली. हमीभाव वाढवण्यात आल्यामुळे पेरा वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात हरभरा पिकाखालील क्षेत्र प्रामुख्याने कोरडवाहू आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण आणि वाढती उष्णता यामुळे उत्पादकतेला फटका बसला. दरवर्षी बाजारात आवक वाढल्यानंतर राज्यातून व्यापारी, मिलर्स खरेदी करत होते. मात्र यंदा राज्यातील मिलर्स शेजारच्या गुजरात राज्यात जाऊन खरेदी करत आहेत. यावरून राज्यातील उत्पादनाचा अंदाज काढता येऊ शकतो. त्यातच दर वाढत असल्याने शेतकरीही माल राखून ठेवत आहेत. राज्यात बहुतेक भागांत गुणवत्ता चांगली असल्याचे सूत्रांनी सांगितले. ➡️ हरभरा आयात:- केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात हरभरा आयातीवरील शुल्क वाढविले आहे. सर्व शुल्कांचा विचार करता जवळपास ६६ टक्के शुल्क आयातीवर द्यावे लागते. देशात काबुली हरभऱ्याची आयात प्रामुख्याने रशिया आणि सुदान या देशांमधून होते. तर देशी हरभऱ्याची आयात टांझानिया आणि काही प्रमाणात ऑस्ट्रेलिया आणि इथिओपिया या देशांमधून होते. ➡️ पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून वाटप:- कोरोना काळात सरकारने गरिबांना मोफत वाटपासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना राबविली. या योजनेंतर्गत हरभरा वाटप करण्यात आले. एप्रिल ते जून या काळात सरकारने १४.१२ लाख टन वितरण केले. यामुळे यंदा नाफेडकडे कमी साठा उपलब्ध आहे. ही योजना सरकारला पुढील काळात सुरू ठेवायची असल्यास यंदाही मोठ्या प्रमाणात खरेदी करावी लागेल. नाफेडने बाजारात मोठी खरेदी केल्यास बाजारातील दराला आधार मिळेल आणि दर लवकरच हमीभावावर पोहोचतील. ३१ मार्चपर्यंत बाजारात झालेली अंदाजे आवक (टक्क्यांत) गुजरात ३० ते ४० महाराष्ट्र ३५ ते ४० राजस्थान ५ ते १० मध्य प्रदेश ५ ते १० ➡️ उत्पादन घटण्याची कारणे:- कर्नाटकात शेतकऱ्यांची कडधान्यांऐवजी कापसाला पसंती मध्य प्रदेश आणि राजस्थानात मोहरी, गहू आणि मसूरला पसंती मध्ये प्रदेशात पिकावर-कीड-रोगाचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी घाटे भरण्याच्या स्थितीत पावसाचा फटका वाढत्या उष्णतेचाही उत्पादकतेवर परिणाम राजस्थान, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात पावसाचा फटका महाराष्ट्रात पावसाचा परिणाम, घाटे भरण्यालाही अडचण बाजाराची सद्यःस्थिती ➡️ उत्पादनातील घटीच्या अंदाजाने सुरुवातीपासूनच दरवाढ गेल्या हंगामात सुरुवातील ३५०० ते ३६०० रुपये दर यंदा प्रारंभीच ४७०० ते ४८०० रुपये दर पुढील दोन ते तीन महिन्यात बाजारभाव हमीभावाएवढे राहण्याचा अंदाज सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान दर ६ हजार रुपयांचा टप्पा गाठण्याचा सूत्रांचा अंदाज हंगामात दर उच्चांकी ७००० रुपयांपर्यंत पोहोचण्याचा व्यापारी सूत्रांचा अंदाज. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
12
इतर लेख