AgroStar
रब्बी हंगामातील ६० टक्के पेरण्या पूर्ण
कृषि वार्तापुढारी
रब्बी हंगामातील ६० टक्के पेरण्या पूर्ण
राज्यात रब्बी पिकांखाली ५६.९३ लाख हेक्टरइतके क्षेत्र आहे. कृषी आयुक्तलयाच्या १३ डिसेंबरअखेरच्या ताज्या अहवालानुसार सदय:स्थितीत ३४.४९ लाख हेक्टरवरील म्हणजे सरासरीच्या ६०.५९ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. हरभरा पिकाखालील सरासरी क्षेत्र १४.९० लाख हेक्टर असून, सदयस्थितीत १३.४० लाख हेक्टरवर म्हणजे ९० टक्के पेरा पूर्ण झाला. ज्वारीची ५५ तर गव्हाची ४२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. चालू वर्षी खरीपात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळीमुळे पाणी उपलब्धता अधिक आहे. त्यामुळे अहवाल काळात हरभरा, ज्वारी, गव्हाच्या पेरण्यांचा पेरा गवतवर्षीपेक्षा तुलनेने अधिक झाल्याचे दिसून येत आहे. संदर्भ – २० डिसेंबर २०१९, पुढारी जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
13
0
इतर लेख