AgroStar
कांदा निर्यातीवर बंदी
कृषी वार्तापुढारी
कांदा निर्यातीवर बंदी
नवी दिल्ली – कांदयाचे दर देशभरात वाढलेले आहेत. 60 ते 80 रू. किलो दराने कांदा विकला जात आहे. देशांतर्गत बाजारात कांदयाची उपलब्धता वाढावी, यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. वाणिज्य मंत्रालयातंर्गत विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे.
आयात व निर्यातीचा विषय ‘डीजीएफटी’च्या अधिकारक्षेत्रात आहेत. याआधी 13 सप्टेंबरला डीजीएफटीने कांदी निर्यातीला लगाम घालण्यासाठी किमान निर्यात मूल्य टनामागे 850 डॉलर ठरवून दिले होते. देशांतर्गत बाजारात कांदयाचे दर कमी व्हावेत, हा हेतू यामागे होता. संदर्भ – पुढारी, 30 सप्टेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
417
1
इतर लेख