येत्या 4-5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता!
हवामान अपडेटTV9 Marathi
येत्या 4-5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता!
पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.दरम्यान, गेल्या चोवीस तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पुढील चार ते पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून कळवण्यात आलं आहे. राज्यात पुढील चोवीस तासांत पावसाची परिस्थती कायम राहणार आहे. आज विविध जिल्ह्यांना यलो अॅलर्ट आता पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. २२ ​नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
58
12
इतर लेख