नोकरीAgrostar
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
➡️सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत अनेक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत असून त्याचा खूप मोठा लाभ हा नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना होताना दिसून येत आहे.
➡️स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत होणार भरती:
स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एसएससीने बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी दिली असून या आयोगामार्फत परीक्षेचे नोटिफिकेशन देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. दोन ऑगस्ट रोजी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून स्टेनोग्राफर या पदासाठी भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
➡️या परीक्षेसाठी असलेले निकष
स्टाफ सिलेक्शन मार्फत घेण्यात येणारी स्टेनोग्राफर या पदासाठी ची परीक्षा ही दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील परीक्षा ही संगणकावर आधारित असणार असून दुसऱ्या टप्प्यात कौशल्य चाचणी अर्थात स्किल टेस्ट घेण्यात येणार आहे.
➡️किती मिळेल वेतन?
1- स्टेनोग्राफर ग्रुप सी- याकरिता बेस स्केल हे 9300 ते 34 हजार 80
2- पे बँड- चार हजार दोनशे किंवा चार हजार सहाशे( वेतन ग्रेड 2 )
3- सुरुवातीचा पगार- पाच हजार दोनशे रुपये आणि बेसिक पे हे 14500 असणार आहे.
➡️स्टेनोग्राफर या पदासाठीची पहिल्या टप्प्याची परीक्षा ही 12 ते 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
➡️या परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही 23 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे.
➡️जर तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला https://ssc.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.
➡️संदर्भ:-Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.