प्रकाश सापळ्याचा वापर करून पिकातील किडींचे नियंत्रण!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
प्रकाश सापळ्याचा वापर करून पिकातील किडींचे नियंत्रण!
• भाजीपाला व इतर पिकांमध्ये तर रासायनिक कीडनाशकांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. पिकांमध्ये पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर अधिक होत असतो. त्यामुळे पिकांतील मित्र कीटकांच्या संख्येवरही परिणाम आढळून येतो. रासायनिक कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे पिकांवर व वातावरणावर होत असलेले परिणाम यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड व्यवस्थापनातील अन्य घटकांचा वापर वाढावयास हवा. • पावसाळ्यात प्रामुख्याने अनुकूल वातावरणात किडींचा उपद्रव व प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात किडींच्या नर व मादीच्या मिलानामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नर व मादी हे प्रकाशाच्या किरणांकडे आकर्षित होत असतात. या सापळ्यांच्या खाली पाण्याने भरलेला टब ठेवावा. यामध्ये किडी पडतात. या किडी गोळा करून नष्ट करता येतात. तसेच किडींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहेत हे ताडताळण्यासाठी देखील याचा फायदा होतो. हा सापळा आपण टोमॅटो व वांगी पिकातील फळ पोखरणारी अळी, सोयाबीन, भुईमूग व हरभरा पिकातील अळी, मका पिकातील खोड कीड, धान व ऊस पिकातील किडी तसेच पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी वापर करू शकतो. प्रकाश सापळ्याचे महत्व : १) प्रकाश सापळे पिकातील हानिकारक कीटकांना नियंत्रण करण्यात मदत करते. २) हंगाम सुरु होण्याआधी प्रकाश सापळ्याचे वापर केल्यास पिक क्षेत्रातील पिकांवर प्रादुर्भाव करू शकणाऱ्या किडींचा अनुमान लावण्यात मदत होते. ३) प्रकाश सापळे मित्र कीटकांना सुरक्षित आहे. ४) प्रकाश सापळे पर्यावरणाला अनुकूल आहे. सापळे जाड प्लास्टिक ने बनले असल्यामुळे टिकाऊ आहेत. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
6
इतर लेख